पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत शनिवारी (दि. 8) सायंकाळी 4 वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रकमेची बक्षिसे असणार आहेत.
कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदानावर ही स्पर्धा पुरुष व महिला अशा गटात होणार आहे. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला सात हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये व चषक, महिला गटातील प्रथम पारितोषिक सात हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये व चषक, तर तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये व चषक तसेच प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला रोख एक हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …