Breaking News

भाजप खोपोली शहर अध्यक्षपदी इंदरमल खंडेलवाल

खोपोली : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर मंडळ अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते इंदरमल खंडेलवाल यांची शुक्रवारी (दि. 27)बिनविरोध निवड करण्यात आली. शहरातील लोहाणा  समाज सभागृहात भाजप शहर मंडळ आयोजित कार्यकर्ता बैठकीत जिल्हा सरचिटणीस व पक्ष निरीक्षक बंडू खंडागळे यांनी इंदरमल खंडेलवाल यांच्या नावाची घोषणा केली.

राज्य व जिल्हास्तरीय पक्षांतर्गत पदाधिकारी निवड कार्यक्रम सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खोपोली शहर मंडळाचा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. शहर अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. यामध्ये मावळते अध्यक्ष श्रीकांत पुरी व इंदरमल खंडेलवाल ही दोन नावे चर्चेत होती. अखेर पक्षनिरीक्षक खंडागळे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून खंडेलवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

खोपोली शहर अध्यक्ष निवडणूक कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सचिव सूर्यकांत देशमुख, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, खोपोली नगर परिषद परिवहन सभापती तुकाराम साबळे, खोपोली संपर्क प्रमुख शरद कदम, ज्येष्ठ नेते रामभाऊ तावडे, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, युवा अध्यक्ष इंदुलकर, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, दिलीप पवार, जिल्हा महिला आघाडीच्या अजया जाखोटिया, स्नेहल सावंत, मागासवर्गीय सेलच्या शोभा काटे, शहर उपाध्यक्ष पाटील, चंद्रप्पा अनिवार, माजी अध्यक्ष दिलीप निंबाळकर, ईश्वर शिंपी यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंडू खंडागळे, शरद कदम, अश्विनी पाटील, अ‍ॅड. येरुणकर, रामभाऊ तावडे, इत्यादींनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इंदरमल खंडेलवाल यांनी पक्ष संघटना वाढीसाठी सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. सूर्यकांत देशमुख यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply