महाड ः प्रतिनिधी
रायगड किल्ल्यावर शनिवारी (दि. 6) 347वा शिवराज्याभिषेक सोहळा मंत्रोच्चार आणि शंखानादाच्या गजरात दिमाखात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने या ठिकाणी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती, मात्र असले तरी हा सोहळा अत्यंत थाटात पार पडला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापूरचे युवराज शहाजी राजे भोसले उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात दुपारी गडपूजनाने झाली. यानंतर शिरकाई देवी पूजन करण्यात आले. त्याअगोदर सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर राजसदरेवर महाराजांना मानवंदना देण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. या वेळी शिवआरतीचे पठण करण्यात आले.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …