अलिबाग ः प्रतिनिधी
देशात लागू करण्यात येत असलेल्या एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 26) अलिबाग शहरात भाजपच्या वतीने रॅली काढण्यात आली. या वेळी ‘देश के गद्दारोंको गोली मारो सालोंको’ अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अलिबाग मतदारसंघाचे अध्यक्ष महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली बालाजी नाका, जुनी नगर परिषद, एसटी स्टँड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रायगड बाजार अशी शहरभर फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली.
या रॅलीत भारतमाता की जय तसेच एनआरसी, पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, सतीश लेले, अॅड. पल्लवी तुळपुळे, दर्शन प्रभू आदींसह शेकडो नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. 100 मीटर लांबीचा तिरंगाही या रॅलीत फडकवण्यात येत होता.
Check Also
माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास
ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …