Breaking News

कर्जत-मुरबाड रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद; प्रशासनाचा निर्णय

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या अहवालानुसार कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवरील कळंब येथे असलेल्या जुन्या पुलाची स्थिती नाजूक असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने मंगळवार (दि. 7)पासून हा पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक येथून येणारी अवजड वाहने पाटगाव येथून बदलापूर अशी होऊन कर्जतला जातील आणि कर्जत येथून नाशिक, शहापूरकडे जाणारी वाहने कर्जत येथून बदलापूर अशी पुढे पाटगाव रस्त्याने मुरबाडकडे जातील. या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचे    रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सुरू आहे. त्यात काही ठिकाणी जुने पूल पाडून नवीन पूल आणि सुस्थितीत असलेल्या पुलाच्या जागी अतिरिक्त पूल यांची उभारणी राज्य रस्ते विकास महामंडळ हे केंद्र सरकारच्या निधीमधून करणार आहे. त्यासाठी जुन्या रस्त्यावर असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यात पोश्री नदीवर असलेल्या कळंब येथील पुलाची स्थिती नाजूक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा अहवाल रस्ते वाहतूक मंत्रालयाने रायगडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केल्यानंतर रायगड पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या पथकाने कळंब येथील पुलाची पाहणी केली. त्यानंतर सर्व अहवाल पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर केला होता. जिल्हाधिकार्‍यांनी राज्य सरकारची परवानगी घेऊन मंगळवारपासून शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहतूक करण्यास बंदी

घातली आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply