Breaking News

इंडियन नेव्हीची महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅली

अलिबाग : प्रतिनिधी

इंडियन नेव्हीतर्फे महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई डॉकयार्ड येथून सायकलिंग, सेलिंग्ज आणि धावपटूंच्या माध्यमातून अर्नाळा ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत 555 किमीची रस्ते आणि समुद्रमार्गे रॅली काढण्यात आली आहे. सोमवारी (दि. 6) सायकलिंग रॅली अलिबाग येथे दाखल झाली. मंगळवारी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. 11 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर या रॅलीचा समारोप होणार आहे.

महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅलीमध्ये 15 सायकलपटू, 15 धावपटू आणि 6 सेलिंग्ज अधिकारी सहभागी झाले आहेत. या रॅलीसोबत दोन टीम सहभागी असून लेफ्टनंट ब्रूगेंद्र जोशी, लेफ्टनंट कौशल सबनीस हे टीमचे नेतृत्व करीत आहेत. मंगळवारी सकाळी अलिबागहून ही  रॅली पुढील प्रवासासाठी रवाना झाली. इंडियन नेव्ही दलाच्या प्रमुख रेड्डी, कॅप्टन मंगेश दळवी यांच्यासह इंडियन नेव्हीचे अधिकारी, नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंडियन नेव्हीमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, तसेच कोस्टल सुरक्षा माहिती तरुणांना, विद्यार्थ्यांना व्हावी, हा या रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली सायकल, रनिंग, रस्तेमार्ग आणि समुद्रात बोटीमार्गे काढण्यात आली आहे. रॅलीदरम्यान येणार्‍या शाळा, कॉलेजमध्ये जाऊन नेव्हीचे अधिकारी हे नेव्हीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. पदवी, पदव्युत्तर, डॉक्टर, इंजिनियर, पायलट यांसारखे शिक्षण घेतल्यानंतरही इंडियन नेव्हीत सहभागी होता येते. याबाबतची माहिती या रॅलीमधून विद्यार्थ्यांना दिली जात आहे, तसेच गड-किल्ल्यांची स्वच्छताही करण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply