Breaking News

कामोठे येथे आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

माने सर्जिकल सेंटर आणि जनरल हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 25) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजप नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. या वेळी पनवेलच्या शूश्रुषा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे  डॉ. संजय तरलेकर (एमडीडीएम कार्डिओलॉजी) आयोजित हृदयविकार चाचणी शिबिर झाले. यात डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला. एक्स रे मध्ये पन्नास टक्के, आयराणी मध्ये पन्नास टक्के सूट, 1000च्या पॅकेजमध्ये टूडी एको सीबीसी पीएमटी लिपिड प्रोफाइल, हृदय तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला, ऍन्जिओग्राफी व एन्जोप्लास्टी यासारखी सर्जरी, केशरी काळा रेशनकार्ड असल्यास लाख दोन लाखांची सर्जरी मोफत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या वेळी डॉ. धनाजी माने (एमबीबीएस जनरल सर्जन लॅप्रोस्कोपीक), डॉ. प्रमिला माने (एमबीबीएस स्त्री रोग तज्ञ), अ‍ॅड. संगीता आदी उपस्थित होते. जवळपास 100हून जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांनी दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply