पेण : प्रतिनिधी
अंकुर ट्रस्ट व मैत्रेय राज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच निराधार महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर घेण्यात आले. त्यात पेण तालुक्यातील 20 आदिवासीवाड्यांतील 100पेक्षा अधिक महिला व पुरुषांनी आपली तपासणी करून घेतली. मैत्रेय राज फाऊंडेशनच्या इमारतीमध्ये झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रवीण म्हात्रे यांनी केले. डॉ. अश्विनी पवार आणि डॉ. नेत्रा पाटील यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली, तर डॉ. रशिदा परवीन यांनी सांधे व हाडांचा आजार असलेल्या रुग्णांची फिजिओथेरपी केली. सूत्रसंचालन कौस्तुभ भालेकर यांनी केले. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील, डॉ. अजय कदम, येरळा मेडिकल ट्रस्टचे डॉ. प्रथमेश ढमाळ, डॉ. मंगेश पाटील, राज पाटील उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.