Breaking News

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची निवड झाली आहे. त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते गायकवाड यांचा शुक्रवारी (दि. 24) सत्कार करण्यात आला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, रुचिता लोढें, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply