Breaking News

श्रीवर्धनमध्ये प्रजासत्ताक दिन जल्लोषात

श्रीवर्धन : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीवर्धन शहरामध्ये विविध ठिकाणी  ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिक्षक बाबुराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपालिका शाळा क्र. 1 येथे नगर परिषदेचे शिक्षण सभापती शबिस्ता सरखोत यांनी ध्वजारोहण केले. र. ना. राऊत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल भ्ाुसाणे, गोखले एज्युकेशन संस्थेमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन केंद्राचे समन्वयक नरहर बापट, श्रीवर्धन सत्र न्यायालयात  न्या. प्रतिक लंबे, नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी किरणकुमारे मोरे,  पंचायंत समितीमध्ये सभापती बाबुराव चोरघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या प्रांगणामध्ये उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर संतोष सापते, श्री. मुरकर यांनी कराटेची प्रात्याक्षिके सादर केली. तहसिलदार आ. ए. गिरी, नगरपालिका मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, पंचायत समिती सभापती बाबुराव चोरघे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे आदी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply