पनवेल ः रामप्रहर वृत्त
1 मे रोजी महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. ज. भ. शि. प्र. संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला मेंबर बोर्ड ऑफ डायरेक्टर वसंतशेठ पाटील, विजय घरत उपसरपंच गव्हाण, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, रुपेश म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, वसंत म्हात्रे, किशोर पाटील, अमर म्हात्रे, मुख्याध्यापक जाधव, पर्यवेक्षक भर्णुके, शिक्षक कोळी, भोईर, लाइफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा लाईफ वर्कर जोत्स्ना ठाकूर, विद्यलयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता गोले, छत्रपती शिवाजी विद्यलयाच्या मुख्याध्यापिका डोईफोडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.