पनवेल : प्रतिनिधी
अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि हार्मोनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 9) पनवेल तालुक्यातील सांगुर्ली येथे व्यसनमुक्तीपर उपक्रम घेण्यात आला. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नभी घेऊ उत्तुंग भरारी हा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षणतज्ञ तथा चित्रपट अभिनेत्री विद्या वाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, निर्व्यसनी रहा असे सांगितले. तुम्हाला चार भिंतींच्या आत राहयचे नाही. जग खूप मोठे आहे. आयुष्यात पुढे पुढे जा आणि यशस्वी व्हा, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला. या वेळी वाडकर यांना स्व. जफर गोरखपुरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस अधिकारी सुरेश जाधव, जल फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर जाधव, ‘कोकण डायरी’ चे संपादक अकबर सय्यद, प्रा. पाटील, कामगार नेते धनराज पाटील, समाजसेवक मानवेंद्र वैदू, दलिततमित्र सुदेश दळवी, पीजेबी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका इंदुमती ठक्कर आदी उपस्थित होते. नभी घेऊ उंच भरारी या कार्यक्रमाची संकल्पना नासिर खान यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपक कदम यांच्या गाण्याचा तास व अॅड सुरेखा भुजबळ यांच्या गगन सदन या गाण्याने झाली. यानंतर पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीवर आधारित व एच. एन.पाटील व हर्षाला पाटील यांचे दिग्दर्शन असलेली जागर व्यसनमुक्तीचा ही नाटिका सादर झाली. यानंतर सुरताल अकादमीचे रविकांत भोपी यांचे शहिदांवर आधारित गीत व अन्य गाणी झाली. व्यसनमुक्त होणार्यांनीदेखील गाणी सादर केली. हार्मोनियमवादक आकांक्षा मुंडे व तबल्यावर यश दळवी यांनी साथ केली. या वेळी डॉ. मधु निमकर, समाजसेविका चित्रा भगत, अॅड. सुरेखा भुजबळ यांचा महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला. पत्रकार जितेंद्र नटे यांना लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार मिलिंद खारपाटील यांचा वाढदिवसही साजरा झाला.
प्रा. पाटील, अर्जुन हांडोरे, लवेंद्र मोकल, भास्कर पाटील व तुळशीदास पाटील यांनी व्यसनमुक्तीवर अधारीत कविता सादर केल्या. कार्यक्रमाचा शेवट स्वरा गायकवाडच्या ध्यान धारणेने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली पाटील हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर दीप बालविकास फाऊंडेशन आणि महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेचे नासीर खान, सचिव सलमा खान, राजकुमार ताकमोघे, रमेश चव्हाण, दिनकर दळवी, अस्लम नाईक, मंजूषा कदम, ललित गोविंद, सचिन कदम यांनी मेहनत घेतली.