उरण : बातमीदार उरण तालुक्यात समुद्रकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा 280वा विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 10 मार्च 1739 रोजी सरखेल मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून स्वराज्यात घेतला होता. उरण तालुक्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेला द्रोणागिरी किल्ला जिंकून 280 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान उरणतर्फे या किल्ल्यावर विजय दिन साजरा करण्यात आला. या वेळी सर्वप्रथम गडपूजन व ध्वजपूजन झाले. त्यानंतर गडावरील बाटल्या व प्लास्टिकचा कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
Check Also
जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …