Breaking News

मुरूडमध्ये पथनाट्यातून मतदार जागृती

मुरूड : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तहसील कार्यालय व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदान एक जबाबदारी’ या पथनाट्याद्वारे मुरूडमध्ये मतदारजागृती करण्यात आली.

तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदान प्रक्रियेबाबत, तसेच दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनप्रबोधन केले. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. महिला मतदारांनी 100 टक्के मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदारांनी आपला पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, डॉ. मुरलीधर गायकवाड, श्रीशैैल बहिरगुडे याच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या पथनाट्यात ममता कार्लेकर, सेजल कारभारी, आशिष आग्रावकर, तृप्ती दांडेकर, रोहन जाळगावकर, मयंक तांबडकर, पूर्वा डोगरीकर, रफिक सय्यद, आकाश कतिय आदी कलाकार सहभागी झाले होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply