पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘रयत’चे सचिव भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीनही विभागांच्या प्रयोगशाळेची पाहणी केली. ‘रयत’चे बाळासाहेब कारंडे, संजय मोहिते, शहाजी फडतरे, प्राचार्य राजू गर्ग, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, प्रितीका दास, सौ. गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.