Breaking News

बारावीच्या परीक्षेत यंदाही कोकण विभाग नंबर वन!

निकालात मुलींची बाजी

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी (96.01 टक्के) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. राज्यात एकूण 14,16,371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वर्षी 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणार्‍या मुलांचे प्रमाण 89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणार्‍या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Check Also

कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक कामोठे ः रामप्रहर वृत्तनेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. …

Leave a Reply