पनवेल : राज्यात सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना कोरोनानेही डोके वर काढले आहे. कोरोनाचे निर्बंध असले तरी नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत घरात राहून करणेच पसंत केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढून तो आकडा आठ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट राज्यावर घोंगावताना दिसत आहे. त्यातच राज्य सरकारने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 15 जानेवारीपर्यंत नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार विवाह समारंभासाठी 50, तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोक उपस्थित राहतील. धार्मिकस्थळांवर येणार्या भाविकांवरही पोलिसांनी बंधने लागू केली आहेत.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …