Breaking News

विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची भरदिवसा हत्या

लखनौ : वृत्तसंस्था

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. 2) सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौत घडली. बच्चन हे मॉर्निंग वॉकला जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

रणजित बच्चन रविवारी सकाळी 6.30 वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रांसमवेत ग्लोब पार्कमध्ये ते  फिरण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बच्चन यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्यासोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले, तर डोक्यात गोळी लागल्याने बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला.

गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या अटकेसाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply