Breaking News

फडके विद्यालयात शुभास्ते पंथान: कार्यक्रम उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शुभास्ते पंथान: या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 5)करण्यात आले होते.

माध्यमिक शालांत परीक्षेस प्रविष्ट होऊन, आपल्या शालेय जीवनाचा अंतिम टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ न करता त्यांना त्यांचा भविष्यातील प्रवास, पथ, वाट शुभंकर होवो अशा आशीर्वादरुपी शुभेच्छा देणारा शुभास्ते पंथानः  हा विद्यालयाचे वेगळेपण जोपसणारा कार्यक्रम होता.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या प्राचार्या इंदूताई घरत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.  आत्मविश्वास व प्रयत्न हीच विद्यार्थी जीवनातील महत्वाची शक्तिपीठे आहेत. सातत्याने पण नियोजनबद्ध अभ्यास करून सुयश संपादन करा असे शुभाशीर्वाद दिले. या वेळी इयत्ता दहावीतील काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यालयाच्या संवाद पाक्षिकाच्या फेब्रुवारी अंकाचे प्रकाशन इंदूताई घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी उपस्थित होत्या. पर्यवेक्षिका सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply