Monday , January 30 2023
Breaking News

मैदानाबाहेरही विराट सरस; भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये अव्वल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन विराट कोहली फक्त मैदानावरच नाही, तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने सलग तिसर्‍या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे.

अमेरिकेच्या ग्लोबल अ‍ॅडव्हाझरी फर्म डफ अ‍ॅण्ड फेल्प्सच्या रिपोर्टनुसार विराटची ब्रँड व्हॅल्यू 237.5 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे एक हजार 691 कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू 23 मिलियन डॉलर इतकी आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू रोहितपेक्षा तब्बल 10 पट अधिक आहे.

ब्रँड व्हॅल्यूच्या बाबत विराटने बॉलिवूडचे स्टार अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणबीर सिंह, सलमान खान, शाहरुख खान यासारख्या आघाडीच्या कलाकारांनादेखील मागे टाकले आहे. क्रिकेटपटूंचा विचार केल्यास माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हिटमॅन रोहित शर्मा हे पहिल्या  20मध्ये आहेत.

भारताचे टॉप ब्रँड व्हॅल्यू असणारे स्टार क्रमनिहाय

1) विराट कोहली : 1 हजार 691 कोटी

2) अक्षय कुमार : 745 कोटी

3) दीपिका पदुकोण : 666 कोटी

3) रणबीर सिंग : 666 कोटी

5) शाहरुख खान : 471 कोटी

6) सलमान खान : 397 कोटी

9) महेंद्रसिंह धोनी : 294 कोटी

15) सचिन तेंडुलकर : 179 कोटी

20) रोहित शर्मा : 164 कोटी

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply