Breaking News

भाजप प्रवेशाची लाट

पनवेल, उरणमधील विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा होणारा सर्वांगीण विकास आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 800हून अधिक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) पनवेलमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा प्रवेश एवढा मोठा होता की कोणतेही भाषण न होता सलग दोन तास प्रवेशकर्त्यांचे स्वागत सुरू होते.

पनवेल विधानसभा क्षेत्रात येणार्‍या देवद ग्रामपंचायतीच्या शेकापच्या सरपंच शीतल प्रभाकर सोनावणे, उपसरपंच प्रभाकर सखाराम सोनावणे, ग्रामपंचायत सदस्य निलेश बाळकृष्ण जुवेकर यांच्यासह कोकण रेसिडेन्सी, दत्तनाथ आंगण, मैत्री साई श्रद्धा, विकासवाडी रहिवासी, शिवधाम सोसायटी, शिवनगर येथील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनीता प्रदीप घरत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप घरत, भरतकुमार पाटील, हिरामण कोकणे, सुरेश भारती, बाळा जाधव, संदीप पाठक, ओवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अब्दुलशेठ पटेल यांच्यासह समर्थक कार्यकर्ते, नेरे ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सदस्य जगन पाटील, हितेश पाटील, खिडूकपाडा येथील निलेश भोईर, संजय उलवेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, तसेच इंदिरानगर व मालधक्का येथील शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

याचबरोबर उरण विधानसभा मतदारसंघातील साई येथील शेकापच्या कविता म्हात्रे, शीतल म्हात्रे, सरिता म्हात्रे, सपना ठाकूर, रोहिणी ठाकूर, कासप येथील ज्ञानेश्वर गाताडे, किशोर गाताडे, समीर गाताडे, सुरेश गाताडे,  चिरनेर येथील शेकापचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता अनिल पवार, विंधणे येथील शिवसेनेचे किरण जयराम पाटील व असंख्य कार्यकर्ते, चिंचवण येथील केशव ठोंबरे, संजय पोपेटा, अशोक पाटील या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह काँग्रेस व शेकापचे कार्यकर्ते, कल्हे (विठ्ठलवाडी) येथील लक्ष्मीबाई वाघमारे, सदस्य राम वाघमारे, गोपीनाथ पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.

 या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, एकनाथ भोपी, वासुदेव घरत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, अ‍ॅड. मनोज भुजबळ, संतोष भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, कल्पना ठाकूर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मन्सूर पटेल, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, शशिकांत शेळके, अ‍ॅड. इर्शाद शेख, शंकुनाथ भोईर, संतोष मंजुळे, प्रभाकर जोशी, मनोहर मुंबईकर, प्रवीण खंडागळे, किरण माळी, मंगेश वाकडीकर, जगदिश घरत, कर्णा शेलार, विनोद घरत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply