कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पोटल ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवार –
थेट सरपंचपद : मीरा मसणे, ग्रामपंचायत सदस्य : ज्ञानेश्वर तुपे, कृष्णाजी जोशी, सुवर्णा मसणे, वर्षा मसणे, लतीफ कर्णेकर, इस्माईल मालदार, अश्विनी श्रीखंडे
पाली तर्फे खलाटीमधील विजयी उमेदवार –
थेट सरपंचपद : संजना पवार (बिनविरोध), ग्रामपंचायत सदस्य : शिवानी कुंभार, सुनीता देशमुख, सारिका वाघमारे, निर्मला देशमुख, हिराबाई जाधव, तुकाराम भोईर, राम वाघमारे (बिनविरोध)