Breaking News

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची दमदार सुरुवात

अलिबाग : प्रतिनिधी 

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी यजमान महाराष्ट्राने 6 बाद 306 अशी मजल मारली. रणजीत निकम याने आक्रमक फलंदाजी करून शतकी खेळी (140 धावा) केली. हा सामना नागाठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे.

कर्नाटकने नाणेफेक जिंकून महाराष्ट्रास प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली. महाराष्ट्राची अवस्था 5 बाद 127 अशी होती, परंतु रणजीत निकम याने आक्रमक फलंदाजी करून शतक झळकावले. त्याने 170 चेंडूंचा सामना करून 140 धावा केल्या. त्याला पवन शहा (57 ) व ओमकार आखाडे (40) यांनी चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 6 गडी गमावून 306 धावा केल्या होत्या.

सामना सुरू होण्यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठणेचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे यांनी दोन्ही संघांतील खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, स्कोअरर यांचे स्वागत केले. चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, उदय दिवेकर, रमेश धनावडे, अजिंक्य पाटील, मनोज त्रिपाठी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, प्रकाश पावसकर, जयंत नाईक उपस्थित होते.

– नागोठण्याचे मैदान उत्तम येथील मैदान व खेळपट्टी उत्तम आहे. येथे आंतरराष्ट्रीय सामनेदेखील खेळले जाऊ शकतात, असा असल्याचा अभिप्राय महाराष्ट्र व कार्नाटकच्या संघांच्या व्यवस्थापनाने दिला. यंदाच्या हंगामात या मैदानावर कुचबिहार करंडक स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध हैदराबाद, रणजी करंडक स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध झारखंड हे सामने खेळले गेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील सर्व सुविधांनी सज्ज असलेले हे मैदान रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठणे व्यवस्थापनाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून दिले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply