Tuesday , February 7 2023

शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्र्यांचे मन मोठे नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई ः प्रतिनिधी

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आलाय. गुरुवारी (दि. 8) नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मला शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मन मोठे नाही, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. शरद पवार यांनी मला फोन केला. पवार मला म्हणाले की, चांगले काम करा, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मला अद्याप शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण त्यांचे मन एवढे मोठे नाही. मला मंत्रिपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले नाही, पण महाराष्ट्रातील सर्व विभागांतून मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. नारायण राणे यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानले. देशाचा जीडीपी कसा वाढेल तसेच तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करेन, असे पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply