Breaking News

वैश्यवाणी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

पनवेल ः बातमीदार

रायगड जिल्हा वैश्यवाणी महिला संघटनेतर्फे पेण येथील सुमतीदेवी विद्यालय, गुरुकुल शाळा येथे नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा वैश्यवाणी महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात रायगडमधील सर्व वैश्य बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  या वेळी डोला रे डोला, जोगवा मागते, शंकरा रे शंकरा, चला जेजुरीला जाऊ, मल्हार मल्हार, तुफान आलया, दिंडी, खंडेरायाच्या लग्नाला, शिवबा आमचा मल्हारी, एकच राजा येथे जन्मला यांसारख्या विविध गाण्यांवर नृत्य सादर करून महिला व तरुण मुलांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नृत्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून रोख रक्कम व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. पुढचा कार्यक्रम कर्जतमध्ये होणार असल्याचे या वेळी आयोजकांकडून घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भोपतराव, तर उद्घाटन महेश झिंजे यांनी केले. रायगड जिल्हा महिला अध्यक्ष शामल आंग्रे, महिला उपाध्यक्ष वीणा शहाणे, माधवी भोपतराव, रंजना वाणी, रंजना साखरे, स्मिता वाणी, माधवी चौधरी, दत्ता तांबोळी, श्रीपत शेट्ये, अशोक साखरे आदी उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply