पनवेल : बातमीदार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोकडून विमानतळ संबंधित प्रशिक्षण कोर्स सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मुला-मुलींनी सिडकोच्या तारा प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. सिडकोच्या तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या वतीने रोजगारभिमुख प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रमांतर्गत सध्या एअर लाइन्स रिझर्वेशन एजंट, एअरलाईन कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाइन कार्गो एजंट या अभ्यासक्रमाचा समावेश असणारे प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवगेळ्या अभ्यासक्रमांचे पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत. येणार्या सर्वांना मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख अलका दयाल यांनी दिली.