Breaking News

पनवेलमध्ये श्वानांचे लसीकरण

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरात फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांबाबत सामाजिक बांधिलकी जपून काही संस्था व डॉक्टरांनी एकत्रित येऊन या कुत्र्यांना झालेल्या विविध आजारांबाबत माहिती घेऊन त्यांचे लसीकरण केले. त्याचप्रमाणे श्वानांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह कॉलर लावण्यात आले.

भटक्या कुत्र्यांना विविध प्रकारचे आजार जडलेले असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. अनेक वेळा त्यांच्या आजारपणाची लागण इतर कुत्र्यांना होते. अनेक जीवजंतू पसरून माणसांनासुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी पनवेलमधील श्वानप्रेमी संस्थेने डॉक्टरांच्या मदतीने अशा भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले. त्याचप्रमाणे रात्रीच्या काळोखात अनेक कुत्रे रस्त्यावर किंवा एखाद्या गल्लीत असतात. ते दिसत नसल्याने त्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह कॉलर

अडकविण्यात आले.

या वेळी पनवेलमधील नीता पर्वते, अर्चना कुळकर्णी, मनस्वी पावसे, अर्चिता कुळकर्णी, रुचा कदम, विक्रम काळे, शार्दुल लिमये, प्रथमेश दीक्षित, निखिल झाडे, अभिषेक, दिनेश मिश्रा आदींनी एकत्रित येऊन सकाळपासून पनवेल शहरात फिरणार्‍या या भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेऊन त्यांचे लसीकरण केले. यामुळे आगामी काळात विविध रोगांचा फैलाव होण्यास मज्जाव होऊन रात्रीच्या वेळेस होणारे कुत्र्यांचे अपघातही टळणार आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply