मोहोपाडा : प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक येथील श्री स्वामी नारायण गुरुकुल विद्यालयात पारंपरिक पद्धतीने आध्यात्मिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थाप्रमुख योगेश्वर स्वामी, आत्मस्वरूप स्वामी, मुख्याध्यापक जॉन्सन उपस्थित होते. भारताला सणांप्रमाणेच वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. प्रत्येक सण, उत्सवाला काहीतरी महत्त्व आहे या गैरसमजापोटी आपण हे सण साजरे करतो. त्या त्या धर्मातील धर्मगुरू जनसामान्यांना आपला धर्म समजावून सांगतात, पण श्रद्धेपोटी देवाचे नाव जपणारेच लोकांचा भाबडेपणा, हळव्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहेत. निव्वळ श्रद्धा आणि बदलत्या काळानुसार श्रद्धेत येत जाणारी स्थित्यंतरे याबाबत स्वामीजींनी गोष्टी स्वरूपात मार्गदर्शन केले.