Breaking News

पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल एजुकेशन सोसायटी, पनवेलच्या संचालक मंडळाची मुदत 21 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात आल्याने नवीन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी 9 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया संस्था संचालित पनवेलच्या याकूब बेग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाली. संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या 180 सदस्यांपैकी 172 लोकांनी मतदान केले. तसेच या नंतर झालेल्या बैठकीत इकबाल हुसेन काझी यांची सर्वानुमते पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या वाय. बी. हायस्कूल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवीन संचालक मंडळासाठी एकूण 24 उमेदवार रिंगणात होते. मतदान सकाळी 8 वाजता सुरु झाले व संध्याकाळी 5 वाजता संपले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबईतील अन्सारी परवेझ यांनी काम पाहिले. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत होणेकरिता पनवेल शहर पोलिसांची मदत घेण्यात आली.

निवडून आलेले उमेदवार

इकबाल हुसेन काझी, मोहम्मद नूर हसनमिया पटेल, असिफ जुसफ शकर, उसामा गुलामहसैन पटेल, अफ्फान रफिक खामकर, माज शाहनवाज मुल्ला, नाविद अब्दुल कादिर पटेल, असिफ हसन करेल, अब्दुल कदस अब्दुल अझीझ डोलारे, अलीम अमीरुद्दीन पटेल, अब्दल मुकीत अब्दुल लतीफ काझी, मोहम्मद हनीफ शर्फद्दीन मास्टर.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply