Breaking News

सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा चिंतन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

शैक्षणिक वर्ष 2019-2020 मधील मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (दि. 13) शुभेच्छा चिंतन कार्यक्रम साजरा करण्यात आला.  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा चिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सूत्रसंचालन ते आभार प्रदर्शन इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला शुभेच्छा तर दिल्याच पण भावि आयुष्यात वाटचाल करताना जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करताना मेहनत ही किती महत्वाची आहे हे पटवून दिले. जीवनात यश संपादन करण्यासाठी मेहनत करा असे खूप प्रभावशाली मार्गर्शन केले. तसेच इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, ज. भ. शि. प्र. संस्थेचे संचालक संजय भगत यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शाळा समिती सदस्य बावडे, चांगू काना ठाकूर शैक्षणिक संकुलातील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply