पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात रास गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेकरिता अर्चना परेश ठाकूर आणि भाग्यश्री देशमुख यांनी या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाच्या, तसेच विजयादशमीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता करडक आणि फैझान शेख या विद्यार्थ्यांनी केले. विविध मापदंडांच्या आधारे या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले आणि शेवटी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
स्पर्धेनंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बघून परीक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीसुद्धा नृत्यात सहभाग घेतला. या स्पर्धेत कल्याणी अभंग, माधुरी शेलार आणि प्रतीक पाटील यांना या स्पर्धेचे विजेते म्हणून निवडण्यात आले.