Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा

पुणे ः प्रतिनिधी
आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजपसह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, तसेच आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणूक लढवून जिंकू शकतो, असे म्हणत युतीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी (दि. 11) पुणे पालिकेच्या वेगवेगळ्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले असता फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, मी सगळ्या राज्यातच लक्ष घालत असतो. सगळ्याच महापालिकांमध्ये जात असतो. पुण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी मला पुण्यात आमंत्रित केले आहे.  
पुण्यातील नगरसेवकांच्या कामाबाबत समाधानी असल्याचेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थात प्रोजेक्ट्सनी स्पीड पकडायला हवा, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तसेच मी पुण्यातील पदाधिकार्‍यांच्या कामाबद्दलही समाधानी आहे. कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही. आम्ही स्वबळावर जिंकू, असा आत्मविश्वासदेखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply