रोहे : प्रतिनिधी
माणगाव-रोहा एसटी बसला शुक्रवारी (दि. 14) पाले खुर्द येथे अपघात होऊन 11 जण जखमी झाले आहेत. यामध्ये चालक, वाहक व प्रवाशांचा समावेश असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोहा आगाराची बस (एमएच 14 बीटी 1945) माणगाव येथून 13 प्रवासी घेऊन परतत होती. बस दुपारी 2 वा. कोलाड-रोहा मार्गावर पाले खुर्द येथील वळणावर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकली.
या अपघातात वाहक साहिदास बाळू पवार (वय 48, रा. रोहा), फरीदा कुंबेकर (70, श्रीवर्धन), चालक सूर्यकांत मारुती पारसे (46, रोहा), पूनम चंद्रशेखर जाधव (37, धरणाची वाडी, ता. माणगाव), वाहक महेंद्र खेडकर (31, रोहा), शालिनी मोरे (26, महादेववाडी-कोलाड, ता. रोहा), कुंदन भोईर (26, धाटाव), राम मालुसरे (45, मोरंडे रामराज, ता. अलिबाग), पूजा देशमुख (19, रा. शेडसई, ता. रोहा), विकी शेडगे (19, चोरडे, ता. मुरूड), सुमन टिकोने आदी जखमी झाले आहेत. जखमींना रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर यातील एका प्रवाशाला अधिक उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …