नऊ रुग्णांचा मृत्यू; 264 जणांची कोरोनावर मात
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 8) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 264 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला, तर 191 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 85 नवे रुग्ण आढळले. तसेच पाच जणांचा मृत्यू, तर 73 जण बरे झाले आहेत.
मंगळवारी कळंबोलीत 33 नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2321 झाली आहे. कोमोठेत 43 नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2953 झाली आहे. खारघरमध्ये 55 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 2740 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2541 झाली आहे. पनवेलमध्ये 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2414 झाली. तळोजात तीन नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 644 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 13,613 रुग्ण झाले असून 11,542 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.79 टक्के आहे. 1751 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 320 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाड तालुक्यात 14 जणांना लागण
महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यात मंगळवारी (दि. 8) कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले असून, तीन जण बरे झाले आहेत. यामध्ये नडगाव बौद्धवाडी, बिरवाडी, विष्णू मंदिर चवदार तळे, महाड, साईप्लाझा आदर्शनगर महाड, महाड काळीज, वेलकम हॉटेल महाड, सुतारआळी नवेनगर, राजेवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. महाडमध्ये कोरोनाचे 267 रुग्ण उपचार घेत असून 871 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत महाडमध्ये 1184 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जतमध्ये 36 कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी (दि. 8) दोन दिवसांपूर्वीचा रुग्णांचा उच्चांक मोडला असून एका पोलिसासह नवीन 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आतापर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 1068वर पोहचली असून 816 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
मंगळवारी कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 32 वर्षांच्या पोलीस शिपायाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मुद्रे बुद्रुकमध्ये राहणार्या 65 वर्षांच्या व्यक्तीचा, त्याच्या 35 वर्षीय मुलाचा, 28 वर्षीय सुनेचा तसेच एका 11 वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुद्रे खुर्दमधील नाना मास्तरनगरमध्ये राहणार्या 55 वर्षीय महिलेला व तिच्या 29 वर्षीय सुनेला कोरोनाची लागण झाली असून दोन दिवसांपूर्वी तिच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुद्रे बुद्रुकमधीलच एका 24 व एका 19 वर्षांच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली. कर्जतमधील एका 46 वर्षीय व्यक्तीचा, त्याच्या 41 वर्षीय पत्नीचा व त्याच्या 46 वर्षीय भावजयीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वदप येथील महिला व एका 62 वर्षांच्या महिलेलाही कोरोनाची बाधा झाली. कर्जत शहरातील 67 वर्षांची व्यक्ती व एक 32 वर्षांचा तरुण कोरोनाबाधित झाला.
उरण तालुक्यात 35 नवे रुग्ण
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यात मंगळवारी (दि. 8) 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू आणि 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये भेंडखळ, नवघर, म्हातवली नागाव, हनुमान कोळीवाडा, जेएनपीटी टाऊनशिप येथील प्रत्येकी दोन, तर मोठी जुई, केगाव, चिर्ले, नवीन शेवा, मुळेखंड, नेव्हल स्टेशन करंजा, सारडे, उरण, कुंभारवाडा विनायती चाळ, विजय रिसॉर्ट उरण, कोळीवाडा, द्रोणागिरी कॉलनी म्हातवली उरण, बालई रोड, कोटनाका रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, साईनगर साई अपार्टमेंट बोरी, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ चिरनेर, पाणजे, सारडे, गणेश कृपा हाऊसिंग सोसायटी हरी पांडव पाठ, मंगलमूर्ती अपार्टमेंट कुंभारवाडा, मोरा कोळीवाडा, मुळेखंड कुंभार आळी, दत्त मंदिरजवळ चिरनेर, करंजा सातघर, श्रीसाल वाडी नागाव, विंधणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये श्री राम समर्थ अपार्टमेंट उरण, जेएनपीटी प्रत्येकी दोन, तर दिघोडे, करळ, करंजा, जासई, नागाव, बोकडवीरा, कोप्रोली, कंठवली येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. भेंडखळ येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1532 झाली आहे. त्यातील 1233 बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 227 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.