रत्नागिरीची मुंबईवर मात

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल अशी आशा असताना रत्नागिरीने स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली मिनी राज्य अजिंक्यपद असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनिटे असताना रत्नागिरीने अजिंक्यपदावर पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदीपक विजय नोंदवित
वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. त्याला पॅशन प्रो बाईक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला, तर रत्नागिरीचा शुभम शिंदे पकडवीराचा मानकरी ठरला.
प्रभादेवीच्या जर्नादन राणे क्रीडा नगरीत कबड्डीशौकिनांची तुफान गर्दी मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होती, तर स्पोर्ट्सवाला आणि कबड्डी यूनिव्हर्स या यू ट्युब चॅनेलवरून तब्बल 41 हजार क्रीडाप्रेमींना अंतिम सामना पाहिला. काँटे की टक्कर असलेल्या अंतिम सामन्यात शेवटची सात मिनिटे शिलल्क असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. गुणफलकात रत्नागिरी
29-26 असा आघाडीवर होता. तेव्हाच सामन्याला कलाटणी देणारी चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार गुरवने केली.
ओंकारने चढाईत मिळवलेले दोन गुण रत्नागिरीला स्फूर्तिदायक ठरले. त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत 33-26 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण रत्नागिरीचे अभेद्य क्षेत्ररक्षण ते यशस्वीपणे भेदू शकले नाही. दुसरीकडे रत्नागिरीने वेळकाढू खेळ करीत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.
तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा 32-24 असा सहज पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. रायगडकडून स्मितील पाटील आणि गौरव पाटील चमकले, तर मुंबई शहरसमोर ठाण्याचे काहीही चालले नाही. सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांनी अप्रतिम खेळ करीत ठाण्याची 50-23 अशी धूळधाण उडवली. महत्त्वाच्या लढतीत ठाण्याचा संघ अत्यंत दुबळा भासला.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply