Breaking News

महिलांसाठी आयोजित कार्यक्रम रद्द

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी भाजप पनवेल तालुका व शहर मंडल महिला मोर्चा व

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 17) दुपारी 3 वाजता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड, पनवेल येथे आयोजित कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आला आहे. जगभरासह राज्यात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिलांना त्यांच्या आरोग्यविषयी व कायद्याविषयी मार्गदर्शन व व्याख्यान करण्यात

येणार होते.     

तरी सदर कार्यक्रम रद्द झाल्याची सर्वांनी नोंद घेऊन आपापले पदाधिकारी-कार्यकर्त्यांना कळवावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष  अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक यांनी केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply