भोपाळ ः वृत्तसंस्था कमलनाथ सरकारची सोमवार बहुमत चाचणी होऊ न शकल्याने भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवराज सिंह चौहान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणीही होणार आहे, परंतु आता मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या भाषणावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सरकार अल्पमतात असताना राज्यपाल अशा सरकारचे कौतुक करण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी केला होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्ष भाजपने गोंधळ घातला. यातच राज्यपालांनी भाषण संपवले. मध्य प्रदेशाची प्रतिमा आणि संविधानाच्या नियमांचे पालन सर्वांना करावे, असे आवाहन राज्यपाल लालजी टंडन यांनी भाषणाच्या शेवटच्या वाक्यात केले. त्यानंतर कोरोनाच्या धास्तीने विधानसभेचे कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …