
खारघर : कोरोनाच्या महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने रक्त संकलनाचा निर्धार केला आहे. यात योगदान म्हणून खारघर व तळोजा युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद घरत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. या वेळी मोना अडवाणी, विनय पाटील, अंकिता वारंग, प्रमोद पाटील, रितेश रघुराज आदी उपस्थित होते.