उरण : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी उरण पोलिसांनी नागरिकांसाठी नव-नवीन उपाययोजना करीत आहे.
नागरिक सुरक्षित राहावेत, त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने उरण शहरात येणार्या दुचाकी वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. उरण चारफाटा, राघोबा मंदिर व उरण कोर्ट येथे बाहेरून येणार्या दुचाकी चालकांनी आपली वाहने शहरात न आणता दिलेल्या ठिकाणी पार्क कराव्यात व पुढे खरेदीसाठी जावे, कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती खरेदीसाठी जाईल. जीवनावश्यक वस्तू किंवा किराणा सामान खरेदी करताना दुकानात एकच व्यक्ती जाईल. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे. आपल्याला व आपल्यापासून दुसर्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही त्याची काळजी अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जगदीश कुलकर्णी यांनी दिली.