Breaking News

भुकेल्यांना मायेचा घास; उरण पोलिसांकडून नाष्टा वाटप

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी :कोरोनाच्या व्हायरल रोखण्यासाठी जिल्हा प्रश्सानाने उरण परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या बाजूस बेघर असलेल्या, भुकेलेल्या पोटासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 26) उरण-चारफाटा व परिसरात नाष्टा वाटप करण्यात आले.

जीवावर उदार होऊन सुरक्षेचे कर्तव्य असताना सामाजिक भान राखणार्‍या सेवा करीत असणार्‍या उरण पोलीसानन कडून अन्नदान होत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. गुरुवार (दि. 26) उरण पोलिसांनी उरण चारफाटा जवळील नाईकनगर झोपडपट्टी रोड, परिसरातील रोड लागून बसलेल्या गरिबांना भुकेलेल्या गरिबांना नाष्टा म्हणून उपमा, कांदे पोहे, देऊन अन्नदान केले. पुढेही तीन ते चार दिवस वेगवेगळे अन्नदान (पोळी-भाजी) वैगेरे दिले जाईल.

गरीब, गरजू ,भुकेलेल्यांना नेहमीच मदत करावी, अन्नदान हे  सर्वात श्रेष्ठदान  होय आपल्या परीने आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply