पनवेल : रामप्रहर वृत : पनवेल तालुक्यातील रोहिंजण येथील युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे ट्रक चालकांसाठी वाटप करण्यात आले.
करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यात संचारबंदी लागु आहे. त्यामुळे सर्व हॉटेल, बंद असल्यामुळे लांब पल्ल्यासाठी निघालेले ट्रक ड्रायव्हर रस्यावर उपाशी अडकुन पडले. तसेच प्रत्येक नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस बांधव यांच्यासाठी असल्याने त्यांच्यासाठी युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शिळफाटा टोलनाका ते कळंबोली हायवेपर्यंत ट्रक ड्रायव्हर व पोलीस बांधव यांना बिस्कीट व कांदापोहे नाष्टा वाटप करण्यात आले.
या वेळी प्रशांत गायकर, सचिन तांबे, कुंदन पाटील, विकास पाटील उपस्थित होते. पोलीस बांधव व ट्रक ड्रायव्हर यांनी युवा सामाजिक प्रतिष्ठानचे आभार मानले.