Breaking News

पोलिसांकडून नागरिकांसाठी उपाययोजना

उरण : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी उरण पोलिसांनी नागरिकांसाठी नव-नवीन उपाययोजना करीत आहे.

नागरिक सुरक्षित राहावेत, त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने उरण शहरात येणार्‍या दुचाकी वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. उरण चारफाटा, राघोबा मंदिर व  उरण कोर्ट येथे बाहेरून येणार्‍या दुचाकी चालकांनी आपली वाहने शहरात न आणता दिलेल्या ठिकाणी पार्क कराव्यात व पुढे खरेदीसाठी जावे, कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती खरेदीसाठी जाईल. जीवनावश्यक वस्तू किंवा किराणा सामान खरेदी करताना दुकानात एकच व्यक्ती जाईल. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे. आपल्याला व आपल्यापासून दुसर्‍यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही त्याची काळजी अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply