पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व अधिकारी व कर्मचारी मिळून ट्रकचालकांसह इतर अनेक गरजूंना फुड पॅकेट व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप परिसरात करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे सद्या कुठेही काम मिळत नसल्याने पायी मुळ गावी निघालेले मजुर प्रवाशी, हद्दीत पाल टाकून राहिलेले गरीब मजुर, महिला व त्यांची मुले, सर्व बंद असल्याने उपाशीपोटी फिरणारे वेडे, तसेच अडकून पडलेले ट्रकचालक आढळून आले. त्यांना मदतीचा हात म्हणून 200 फुड पॅकेट व पिण्याचे पाण्याचे बॉटल वाटप करण्यात आले.