Breaking News

कामचुकार कर्मचार्‍यावर कारवाई करणार

कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा इशारा : आरोग्य विभागाची बैठक

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत शहर हे राज्यात स्वच्छ आणि कचरा मुक्त शहर अशी ओळख निर्माण करणारे शहर बनले आहे. मात्र आरोग्य विभागांमधील कर्मचारी वर्गाला आलेला आळस झटकून टाकावा आणि शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रेमाने वागावे. असा सल्ला मुख्याधिकारी यांनी दिला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही आणि कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना दिला आहे. शहरातील कचरा मुक्त शहर अशी निर्माण झालेली असताना कर्जत शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागील काही महिन्यात आक्षेप घेण्यात येत आहे. शून्य कचरा डेपो येथील यशस्वी ठरलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हटवण्याची मागणी पर्यंत नागरिक पोहचले आहेत. त्यामुळे पालिकेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी मोर्चा आल्यानंतर अधिक सक्रिय होत कर्जत शहरातील स्वच्छता कायम रहावी आणि कचरा मुक्त शहर हे भूषण कायम राहावे यासाठी मुख्याधिकारी गारवे यांनी सर्व कारभार आपल्या हाती घेतला आहे. शहरातील डंपिंग ग्राउंड, बायो गॅस प्रकल्प आणि शहरातील नागरिकांच्या तक्रारी येत असलेल्या ठिकाणी कचरा प्रश्न समजून घेण्यासाठी भेट देण्याचा धडाका सुरू केला आहे. जागोजागी कचरा साठून राहत असल्याने पालिकेचे लोकप्रतिनिधी यांनी स्वच्छ कर्जत हे स्लोगन बदली करण्यात यावे अशी जाहीर मागणी केली होती. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी आरोग्य विभागामधील निरीक्षकपासून कर्मचारी या सर्वांची बैठक घेवून कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, मुकादम प्रवीण मोरे, नरुद्दिन पठाण तसेच सफाई कर्मचारी यांच्या बैठकीत मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील कचरा प्रश्नाबाबत दररोज नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, त्याचवेळी कर्मचारी हे लोकप्रतिनिधी यांच्या सूचना ऐकून घेत नाहीत अशी तक्रार आपल्या कानावर आल्या आहेत.त्यामुळे सफाई कर्मचारी यांनी आपल्याला दिलेल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचावे आणि दिलेले काम पूर्ण करण्यात कोणतीही कुचराई ठेवू नये अशी सूचना केली आहे.

तक्रारी आल्यास नोटीस बजावणार!

शहरातील करदाते नागरिक आणि जनतेने विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचेशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्या सूचना यांचा आदर करावा अशी सूचना देखील मुख्याधिकारी यांच्याकडून आरोग्य आणि सफाई कर्मचारी यांना केली आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही आणि नियमानुसार कामे केली नाहीत आणि सतत तक्रारी येत राहिल्यास प्रसंगी नोटिसा दिल्या जातील. असा इशारा मुख्याधिकारी यांनी कर्मचारी वर्गाला केल्या आहेत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील कचर्‍याचे प्रश्न, दुर्गंधीचे प्रश्न आगामी काळात निकाली निघतील असे वाटते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply