Breaking News

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ग्रामस्थांना मोफत बोट, टेम्पो सेवा

घारापुरी ग्रामपंचायतीचा उपक्रम

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

कोरोना वायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात घारापुरी बेटावरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित मिळाव्यात यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने घारापुरी ते मोरा अशी बोटसेवा तसेच मोरा ते उरण वाहन (टेम्पो) सेवा मोफत ठेवण्यात आली आहे. या मोफत बोट व टेम्पो सेवेचा तिन्ही गावातील ग्रामस्थांना लाभ घेता येणार असल्याची माहिती घारापुरीचे सरपंच यांनी दिली आहे. तसेच ग्रामस्थांसाठी बाजारहाट, दळणवळण आणि खरेदीचे वार ठरविण्यात आले आहेत. यासाठी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून बोट व वाहनांसाठी पासेसची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने तहसिलदारांचे आभार मानले आहेत. तसेच ग्रामपंचायतीने सदरची व्यवस्था करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply