Breaking News

अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या कंपन्यांनी कामगारांना विमाकवच द्यावे; भाजपची मागणी

रसायनी : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रसायनी पाताळगंगा औद्यागिक क्षेत्रात मोडणार्‍या ज्या काही  अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कंपन्या सुरु आहेत, त्या कंपन्यानी आपल्या कामगारांना 50 लाख विमाकवच द्यावे अशा मागणीचे आमदार महेश बालदी यांचे पत्र भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित कंपन्यांना दिले.

निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाचे संकट हे संपूर्ण देशभर अतिशय गंभीर झाले आहे, या रोगाचा प्रादुर्भान वाढू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे, देशातील या चिंतेच्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍यासर्व कामगारांचा विमा राज्य सरकारने उतरविला आहे.

अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या कंपन्यांनी आपल्या कंपनीमध्ये कामगारांचा त्यांच्या कुटुंबासाठी 50 लाखांचा विमा काढण्यात यावा व त्यांच्या वेतनात वाढ करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजप पदाधिकार्‍यांनी संबंधित कंपन्यांकडे दिले आहे. यामध्ये अल्कजल अ‍ॅमिनीज केमिकल लिमिटेड, बाकुल अरोमॅटीक्स अ‍ॅण्ड केमिकल लिमिटेड, सिप्ला लिमिटेड, नोवोझेमीस साऊथ एशिया प्रा. लि., वॉनबर्ग लि. या कंपन्यांकडे आमदार महेश बालदी यांचे पत्र सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी माळी, माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, गुळसुंदे जिल्हा परिषद युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतिक भोईर यांनी दिले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply