आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नव्याने संगणक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले. या वेळी त्यांनी शिक्षणाच्या दिशेने जो पाऊल टाकत जाईल त्याचा उत्कर्ष ठरलेला आहे, असे प्रतिपादन केले.
‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांच्या सहकार्याने रिटघर विद्यालयात हा संगणक कक्ष सुरू झाला आहे.
या कार्यक्रमाला दुंदरे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसया वाघमारे, भाजपचे बाळाराम भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, दीपक पाटील, वासुदेव भोपी, गुलाब भगत, गजानन भोपी, गुलाबशेठ भोपी, यशवंत भोपी, प्रल्हाद भोपी, गुरूनाथ भोपी, नितीन काठवले, विभागीय अधिकारी फडतरे, महादू डूकरे, रमेश पाटील, नामदेव जमदाडे, बाळाराम पाटील, पुंडलिक तवले, बाळाराम उसाटकर, रमेश नावडेकर, रवी पाटील, शांताराम चौधरी, विष्णू चौधरी, नाना पाटील, कृष्णा सिनारे, किशोर पाटील, हनुमान सिनारे, भाऊबुवा सिनारे, जनार्दन भोपी, विठ्ठल पाटील, मुख्याध्यापिका भारती नाईक, उपशिक्षिका चंद्रलेखा वसंत, शिक्षक शिर्के, काकडे आदी उपस्थित होते.
थायलँड येथे बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविणार्या साहिल सिनारे याचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर शाळेच्या शिक्षिका श्रीमती खुटले यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, संगणाचा सकारात्मक दृष्टिकोनातून वापर केल्याने व्यक्तिगत जीवनामध्ये विकास होईल. आपल्या परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहून अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यात आपल्याला संधी मिळवायची असेल तर शिक्षणासह ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राचे शिखर गाठण्याच्या प्रयत्न करा, मग यश नक्की मिळेल आणि हे यश मिळविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या संगणक कक्षाचा वापर करा.