Breaking News

खारघर येथील विलगीकरण कक्षाकरिता पनवेल महावितरणचा तत्काळ वीजपुरवठा

नवी मुंबई, पनवेल : बातमीदार

वीज ही  अत्यावश्यक सेवा असून  लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी हे वीजपुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत.

खारघर येथील डीजी पोळ फाऊंडेशनतर्फे निमिषा रुग्णालयात, सेक्टर 4 येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासाठी महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्या मंजुरीनुसार 150 के डब्लूचे वीज भार चालू करण्यासाठी, 240 मीटर लांबीची लघु दाब केबल टाकून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. वाशी मंडळ कार्यालयाकडून हे मीटर तातडीने  उपलब्ध करून, सदर काम तीन दिवसात युद्धपातळीवर करण्यात आले. या वेळी अधीक्षक अभियंता वाशी, आर. बी. माने यांच्या मार्गर्शनाखाली कार्यकारी अभियंता माणिक राठोड,  अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिम्पी तसेच आर. जे. पाटील व शाखा अभियंता शेलार यांनी विशेष प्रयत्न करून तीन दिवसात हे काम पूर्ण केले. महावितरण भांडूप परिमंडलच्या कोरोनाचे संकट असतानाही, कर्तव्यनिष्ठ राहून काम करणार्‍या पनवेल शहर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply