Breaking News

विनाकारण फिरणार्‍या वाहनांवर जप्तीची कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात प्रेमाने सांगून, फटके देऊनही लोक ऐकत नाहीत. विनाकारण रस्त्यावर वाहने फिरवणार्‍यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अखेर रायगड पोलिसांनी आता वाहनजप्तीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. यात शेकडो वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. रायगडात ठिकठिकाणी सुरू असलेल्या नाकाबंदीत गुरुवारी (दि. 2)  वाहनांची कसून तपासणी केली जात होती. अलिबागमध्ये शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या वाहनांची नोंददेखील करून घेतली जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही वाहने पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहेत. अलिबागेत रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व पोलीस निरीक्षक कोल्हे हे स्वतः सर्व नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत होते. अलिबागमधील गोंधळपाडा नाका, वरसोली फाटा, बायपास, बस स्थानक या ठिकाणी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply