Breaking News

भाजप नगरसेविकेने राबविला आरोग्यविषयक उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहिवासी भयभीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेरूळ पश्चिमेला प्रभाग 96च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी आरोग्यविषयक उपक्रमांचा धडाका लावत स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचे पडघम वाजू लागताच नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी प्रभागातील जनतेमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करताना 2500 मास्कचे वाटप केले. प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने धूरफवारणी केली. सदनिकांबाहेरील जागा, टेरेस, सार्वजनिक जागेत धूरफवारणी करण्यात आली. ज्या सोसायटीतून मागणी होत आहे, त्या सोसायट्यांमध्ये धूरफवारणी करण्याचे काम सुरुच आहे. याशिवाय परिसरातील 100 गरीब परिवाराला मोफत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply